एक होती चिमणी..


एक होती चिमणी. पण तिला घरटे नव्हते. एकटीच होती ती. तिला कोणीच खेळायला पण नव्हते. एकटीच ती तर सगळं जग फिरायला निघालेली. रोज जेवढे जमेल तेवढे दुर जायचे, अाणि रात्र झाली की झोपायचे. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली की भुर्र उडुन जायचे. पोट भरेल ईतके चरायचे. दिवसा नंतर रात्र, मग पुन्हा दिवस. रोज चिमणीचे असेच चालायचे. कोणी मित्र नाही, कोणी सखा नाही.

कोई ये कैसे बताए की वो तन्हा क्यों है?

काल रात्री ती चिमणी अामच्या घरी अाली. तिने मला प्रश्न विचारला “तु कोण?”
“मी दमित्र.”
“तु काय करतोस?”
“सध्या तुझ्याशी बोलतो अाहे.”
“बाकी काय करतोस?”
“तसे काही विशेष नाही.”
“म्हणजे काय?”

अचानक तिथे एक मांजर अाली अाणी तिने चिमणीला खाऊन टाकलं…

बाकी ऊरले ते फक्त विखुरलेले पंख….